
अजय मराठे महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्काराने सन्मानित
संदीप वानखडे l चांदूरबाजार – आरोग्यसेवा, नर्सिंग क्षेत्रातील उतुंग असे नेतृत्व, निरंतर समाजसेवा,ग्रामीण सशक्तीकरण, महिला आरोग्य आणि युवाशक्तीला दिशा देणारे कार्य या सर्व क्षेत्रात आपला उत्कृष्ट असा ठसा उमटवणारे नाशिकचे श्री. अजय केशरबाई भास्कर मराठे यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार युवा महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे पुणे येथील समिन्स सभागृह, पत्रकार भवन येथे शेकडो मान्यवर, सेवाभावी कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री पुष्पा चौधरी,प्रसिद्ध अभिनेत्री फाल्गुनी झेंडे ,प्रख्यात समाजसेवक डॉ. संजीव टाकसाळे, युवा महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक गणेश वीरकर, उद्योजक राजेश शिंदे,शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासक डॉ अजय कुलकर्णी,ज्येष्ठ आरोग्यतज्ज्ञ डॉ. मिलिंद बाविसकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.अजय मराठे यांचे २५ वर्षांहून अधिक काळ समाजासाठी प्राणपणाने झोकून देणारे नेतृत्व असून ते मूळचे वेल्हाणे गावचे रहिवासी, आणि गेली २५ वर्षे नाशिकमध्ये स्थायिक असलेले श्री. अजय मराठे हे श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर, नाशिक येथे नर्सिंग सुपरिटेंडेंट पदावर कार्यरत